राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 महत्त्वाच्या बातम्या

बाजारभाव, निवडणूक, आणि शासकीय योजनांसंबंधित महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊया. आज 9 नोव्हेंबर 2024, शनिवार. पाहुयात आजच्या प्रमुख बातम्या.

पंतप्रधान मोदींची घोषणा

धुळ्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. शेतकऱ्यांना आता डबल फायदा होणार आहे. नमो शेतकऱ्यांचे 6000 आणि पीएम किसान योजनेचे 12000 रुपये मिळत होते. महायुतीचे सरकार आल्यास ही रक्कम 15,000 रुपये केली जाईल, असे मोदींनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांची महिलांसाठी घोषणा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “तुमचे लाडके भाऊ जिंकून आले तर 1500 रुपये ऐवजी लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2100 रुपये मिळतील.” या घोषणेमुळे महिलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना नवीन बदल: १ डिसेंबर २०२४ पासून लागू होणारे नवीन नियम?

वृद्धांसाठी पेन्शन योजनेत वाढ

महायुतीने वृद्धांसाठी पेन्शन रक्कम 1500 रुपये वरून थेट 2100 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वृद्ध नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महिलांसाठी योजनांचा वर्षाव

महिलांसाठी महायुतीने 2100 रुपये महिना देण्याचे आश्वासन दिले आहे. महाविकास आघाडीने 3000 रुपये, तर वंचित आघाडीने 3500 रुपये देण्याचे वचन दिले आहे. कोणतेही सरकार आले तरी महिलांना नक्कीच लाभ होईल.

हवामानाचा अंदाज

राज्यात थंडीची चाहूल आहे. मात्र, 14 तारखेपासून काही भागांत पावसाची शक्यता आहे. राज्यातील काही भागांत हलका पाऊस होईल.

हे पण वाचा:
देशातील आजचे कापूस बाजार भाव Cotton rate 2 डिसेंबर 2024

मंचर बाजार समितीतील कांद्याचे दर

मंचर बाजार समितीत जुन्या कांद्याला उच्चांकी 70 रुपये दर मिळाला आहे. हा दर गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी दर ठरला आहे.

लातूर बाजार समितीतील सोयाबीनची स्थिती

लातूर बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे, मात्र त्याचे दर घसरले आहेत. हमीभाव केंद्रावर खरेदीला अपेक्षित प्रतिसाद नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत.

तापमानातील बदल

राज्यात तापमानात चढ-उतार सुरू आहेत. सांताक्रुज येथे 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सांताक्रुज, डहाणू, आणि रत्नागिरी येथे कमाल तापमान 35 अंशांच्या पुढे आहे, तर निफाड, नाशिक, महाबळेश्वर, परभणी, अहिल्यानगर, आणि जळगाव येथे पारा 16 अंशांच्या खाली गेला आहे.

हे पण वाचा:
गुजरात आजचे कापूस बाजार भाव Gujarat Cotton rate 2 डिसेंबर 2024

मराठवाड्यातील तूर पिकावर संकट

मराठवाड्यात ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर कीड आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.

कृषी बाजारभाव, पिक विमा, नुकसान भरपाई, तसेच शासकीय योजनांची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी, स्क्रीनवर दिलेल्या व्हाट्सअप लिंकवर क्लिक करून आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा. धन्यवाद.

हे पण वाचा:
पंजाबराव डख पंजाबराव डख महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज: २ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०२४

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा