राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिलांसाठी “लाडकी बहीण” योजनेचा पुढील हप्ता लवकरच

राज्यात निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. “लाडकी बहीण” योजनेचा पुढील हप्ता लवकरच जारी केला जाणार आहे. 20 नोव्हेंबरला राज्यात निवडणुका होणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर आचारसंहितेचा अस्त होईल. त्यानंतर लवकरच या योजनेअंतर्गत महिलांना निधी वितरित केला जाईल.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतील शेतकरी संभ्रमात

सौर कृषी पंप योजनेत अर्ज करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना पेमेंट करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र, अनेक शेतकरी अद्यापही या योजनेबाबत संभ्रमात असल्याचे समजते.

सोयाबीनला मिळत नाही हमीभाव, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

सणासुदीच्या काळातही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्याने त्यांची आर्थिक अडचण वाढली आहे. केंद्र सरकारने तेल आयातीवर निर्बंध लादले असले तरी सोयाबीनला योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना नवीन बदल: १ डिसेंबर २०२४ पासून लागू होणारे नवीन नियम?

कापूस आयातीचा मुद्दा तापला; नाना पटोले यांची मागणी

केंद्र सरकारने कापूस आयात रोखावी, अशी मागणी नाना पटोले यांनी पत्राद्वारे केली आहे. भारतीय कापूस महामंडळाला (CCI) हमीभावाने कापूस खरेदी करण्याचे निर्देश देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे पाटील माघार

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. यापूर्वी त्यांच्या 13 ते 14 जागांवर निवडणूक लढवण्याची चर्चा होती. मात्र, आता त्यांनी स्पष्टपणे माघार घेतल्याचे जाहीर केले आहे.

पावसाने पिकांचे नुकसान, पीक विम्याचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांना नाही

राज्यात पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, आचार संहिता संपल्यानंतरच शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळण्याची शक्यता आहे. शेतकरी 25 टक्के अग्रीम पिक विम्याची आशा धरून आहेत.

हे पण वाचा:
देशातील आजचे कापूस बाजार भाव Cotton rate 2 डिसेंबर 2024

लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मिळणार पण शेतकऱ्यांची भरपाई मात्र अधांतरी

आचार संहिता उठल्यानंतर “लाडकी बहीण” योजनेचा पुढील हप्ता महिलांना दिला जाणार आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा