मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता 29 सप्टेंबर रोजी खात्यात जमा होणार

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिला लाभार्थ्यांना दिलासा देणारे एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे. या योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबर 2024 रोजी महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्यभरातून जवळपास 1 कोटी 5 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 98 लाख अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर

महिला लाभार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. सप्टेंबर महिन्याचा 15,00 रुपयांचा हप्ता पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. विशेषत: ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत अर्ज केले होते, त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचा एकत्रित हप्ता ₹4,500 रूपयांचा दिला जाईल.

आधार सीडिंगच्या अडचणी असलेल्या महिलांना हप्ता वितरित

जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्ये पात्र ठरलेल्या, परंतु आधार सीडिंग नसल्यामुळे हप्ता न मिळालेल्या महिलांना देखील पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता एकत्रितपणे ₹4,500 वितरित केला जाईल. सप्टेंबरनंतर अर्ज केलेल्या पात्र महिलांना ₹1,500 मानधन जमा केले जाईल.

सप्टेंबर महिन्याचा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा

ज्या महिला लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता यापूर्वी वितरित झाला आहे, त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता ₹1,500 त्यांच्या खात्यात जमा केला जाईल. अशा प्रकारे, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांसाठी हे एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक अपडेट आहे.

योजनेबाबत अधिक अपडेट्ससाठी नवीन माहिती लवकरच उपलब्ध होईल.

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा