मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना आहे, ज्याअंतर्गत प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचा उद्देश आहे. या योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना पात्र करून त्यांना सौर ऊर्जा वापरण्याची संधी देण्यात आली आहे.
सेल्फ सर्वे पेमेंटसाठी अंतिम तारीख २४ ऑक्टोबर २०२४
लाभार्थ्यांना सेल्फ सर्वे पेमेंटसाठी २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंतची अंतिम तारीख देण्यात आली होती. ज्यांनी या तारखेपर्यंत आपले सेल्फ सर्वे पेमेंट केले आहे, त्यांना पुढील प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, ज्यांनी पेमेंट केलेले नाही, त्यांचे अर्ज छाटणी करून बाजूला ठेवण्यात येणार आहेत, व नवीन लाभार्थ्यांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नवीन लाभार्थ्यांसाठी २५ ऑक्टोबरपासून प्रक्रिया सुरू
२५ ऑक्टोबर २०२४ पासून नवीन लाभार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी, सेल्फ सर्वे व पेमेंटसाठी मेसेज देण्यात आले आहेत. लाभार्थ्यांनी आपल्या शेतात जाऊन, आपल्या सिंचन साधनाजवळ उभे राहून आवश्यक फोटो घेणे आवश्यक आहे. यामध्ये शेताचा फोटो, सिंचन साधनाचा फोटो, तसेच स्वाक्षरी किंवा नाव अपलोड करणे अपेक्षित आहे. ही माहिती अपलोड केल्यानंतर त्यांना पुढील २४ तासांत पेमेंट करण्याची संधी मिळेल.
२४ तासात पेमेंटची संधी
लाभार्थ्यांनी आवश्यक फोटो व माहिती अपलोड केल्यानंतर त्यांना २४ तासांच्या आत पेमेंट करण्याची सुविधा दिली जाईल. लाभार्थ्यांच्या जात-प्रवर्गानुसार (SC/ST किंवा Open) व त्यांच्या आवश्यकतेनुसार ३ HP किंवा ५ HP सौर पंपांसाठी निश्चित रक्कम भरणे अपेक्षित आहे.
पेमेंटनंतर व्हेंडर निवड व पुढील प्रक्रिया
पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, लाभार्थ्यांसाठी व्हेंडर निवड प्रक्रिया हाती घेतली जाईल. तसेच, जॉइंट सर्वे पार पडल्यावर पंप इन्स्टॉलेशनची प्रक्रिया सुरू होईल. अनेक लाभार्थ्यांनी योजनेत भाग घेऊन पेमेंट केले असून, त्यांच्या कागदपत्रांची छाननी पूर्ण झाली आहे.
दिवाळीनंतर इन्स्टॉलेशनला गती
योजनेच्या अंमलबजावणीत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही अडचणी आल्या असल्या, तरी दिवाळीनंतर या प्रक्रियेला अधिक गती मिळेल. आचारसंहिता संपल्यानंतर, लाभार्थ्यांच्या अर्जांची प्रक्रिया जलद गतीने पार पडली जाईल आणि इन्स्टॉलेशन कार्य अधिक गतिमान होईल.
लाभार्थ्यांना पुढील टप्प्यासाठी तयारीची सूचना
लाभार्थ्यांना अर्ज प्रक्रियेत पुढे जाण्यासाठी मेसेज आले असल्यास, त्यांनी आवश्यक बाबी वेळेत पूर्ण कराव्यात, जेणेकरून पुढील टप्प्यात त्यांचा समावेश होऊ शकेल. सौर ऊर्जा इतर योजनांची माहिती मिळवण्याकरिता बाजूला दिलेल्या व्हाट्सअप वरती क्लिक करून आपल्या ग्रुप वरती आता सामील व्हा!