राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या

आजच्या 15 ठळक बातम्या – 11 नोव्हेंबर 2024, वार सोमवार

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मागील अनेक दिवसांपासून सोयाबीन हमीभावाच्या संदर्भात निदर्शने सुरू होती. शेतकऱ्यांच्या मुख्य मागणीला भाजप सरकारने आता मंजुरी दिली आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी विविध उपाययोजना आखल्या आहेत. भाजपच्या संकल्पपत्रात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत सोयाबीनसाठी 6 हजार रुपये एमएसपी देण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे.

रब्बी हंगामात बियाण्यांचे वाढलेले दर

रब्बी हंगामाच्या तोंडावर बियाण्यांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. यंदा एकरी 600 ते 1000 रुपयांचा वाढीव खर्च झाला आहे. मका बियाण्याचे 3 किलो 600 ग्रॅम वजनाचे एक पाकिट विविध कंपन्यांनी 200 रुपयांपासून ते 600 रुपयांपर्यंत वाढवले आहे. मागील हंगामातील 1400 रुपयांची बॅग आता 1700 रुपयांना विक्री केली जात आहे. तर 1200 ते 1300 रुपयांची बॅग आता 1600 रुपयांपर्यंत वाढली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढला आहे.

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना नवीन बदल: १ डिसेंबर २०२४ पासून लागू होणारे नवीन नियम?

14 तारखेपासून पावसाचा अंदाज

बंगालच्या उपसागरात चक्रकार वाऱ्यांची निर्मिती झाल्यामुळे राज्यात 14 तारखेपासून पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे. तापमानात चढ-उतार सुरूच असून उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे, तर उर्वरित राज्य अद्यापही थंडीची प्रतीक्षा करत आहे. धुळे येथे 13 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. निफाड, नाशिक, जळगाव, महाबळेश्वर या भागांत तापमान 16 अंशांच्या खाली आहे, तर रत्नागिरी येथे उच्चांकी 35.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

शेती पिकांवर विपरीत परिणाम

वारंवार ढगाळ हवामानामुळे शेती पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. बुरशीजन्य रोग आणि पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.

गाळप हंगामाबाबत संभ्रम

गाळप हंगामाबाबत अद्यापही संभ्रमाची स्थिती कायम आहे. गाळपासाठी अद्याप एकाही कारखान्याला परवानगी मिळाली नाही. राज्यात या महिन्यात सुरू होणाऱ्या ऊस गाळपासाठी आतापर्यंत 2003 साखर कारखान्यांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, गाळपाला कधी परवानगी मिळणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे.

हे पण वाचा:
देशातील आजचे कापूस बाजार भाव Cotton rate 2 डिसेंबर 2024

सोयाबीनच्या हमीभावाची स्थिती

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा होत आहे, परंतु सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. सरकारने हमीभावाबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. सध्या सोयाबीनला 4000 ते 4200 रुपये दर मिळत आहे, तर सरकार 6000 रुपये देण्याचे वचन देत आहे. निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन केवळ गाजर ठरते आहे.

कापसाच्या आयातीवर विचार

भारतात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. तरीही इतर देशांतून कापसाची आयात केली जाते, ज्यामुळे देशांतर्गत कापसाचे दर घसरतात. हे टाळण्यासाठी कापसाची आयात बंद करण्याची मागणी शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केंद्र आणि राज्य शासनाकडे केली आहे.

तापमानातील बदल

वातावरणातील बदलांमुळे किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. ढगाळ हवामानामुळे सरासरीपेक्षा तापमान वाढण्याची शक्यता आहे. 14 तारखेपासून राज्यातील दक्षिण भागात पावसाचा इशारा आहे.

हे पण वाचा:
गुजरात आजचे कापूस बाजार भाव Gujarat Cotton rate 2 डिसेंबर 2024

अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हाट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुप वरती सामील धन्यवाद.

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा